'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही स्टार प्रवाहवरील (star pravah) मालिका सध्या विविध कारणांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनिरुद्धपासून विभक्त झालेली अरुंधती सुखाने तिचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, अरुंधतीला नात्यातून मोकळं केल्यानंतरही अनिरुद्ध तिची पाठ सोडायला तयार नाही. तो सातत्याने तिच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर तिच्या विरोधात नवनवीन डाव रचला होता. यामध्येच आता अनिरुद्ध जाहीरपणे अरुंधतीची माफी मागितली होती. अनिरुद्धने अरुंधती आणि आशुतोष विरोधात खेळलेली ही खेळी आता सगळ्यांसमोर येणार आहे.
सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात अनिरुद्धने रचलेला डाव त्याच्यावरच उलटणार आहे. आशुतोष पुराव्यांसह अनिरुद्धने मोठ्या शिताफीने आखलेला डाव उघड पाडणार आहे.
कांचन आई देवाने अनिरुद्धला सुबुद्धी दिल्याचं सांगतात. याला सुबुद्धी नाही तर दुर्बुद्धी झाल्याचे आशुतोष केळकर म्हणतात. अनिरुद्ध आपल्याला काही दुर्बुद्धी झाली नसल्याचं सांगतो. रिपोर्टसपैकी एकाच अनिरुद्धला फोन आला होता आणि त्यानेच हा इंटरव्हु घडवून आणल्याचा आरोप आशुतोष आणि नितीन करतो.
अरुंधती जोगळेकरांबद्दल बोलताना तुम्ही आशुतोष केळकरांकडे संशय जाईल असे बोलला आहेत असा दावा नितीन करतो. तसेच या अनिरुद्ध विरोधात पुरावे असल्याचेही नितीन सांगतो यावरून त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू शकतो. हे ऐकून संजना आणि कांचनला धक्का बसतो. अनिरुद्धचा डाव सगळ्यांसमोर येणार का? आशुतोष खरंच अनिरुद्ध विरोधात अब्रु नुकसानीचा दाव ठोकणार का?, अनिरुद्धचं सत्यसमोर आल्यावर अरुंधती काय करणार? हा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.