छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. या मालिकेत आप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या लेकीचा विवाह पार पडला.
आई कुठे काय करते मालिकेत आप्पांची भूमिका अभिनेते किशोर महाबोले यांनी साकारली आहे. काही दिवसांपूर्वी किशोर महाबोले यांची लेक सृष्टी महाबोले हिचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले. आपल्या लेकीच्या लग्नात तिच्यासोबत काढलेला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यासोबतच चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांनी आभार देखील मानले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “माझी मुलगी चि.सौ.का. सृष्टीच्या लग्नात आपण आशीर्वाद पाठवले त्यामुळे लग्न निर्विघ्न पार पडले धन्यवाद।”