Join us

'आई कुठे काय करते'फेम मधुराणीच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे खूप खास, म्हणाली- तुझ्यामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 8:12 PM

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीला तुफान लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिच्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. हा व्हि़डिओ शेअर करत ती लिहिते की, बाळा, होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई. आज तुझा आणि आई म्हणून माझाही...जन्मदिवस..! माझ्या आयुष्यातला सगळ्यात अगदी सगळ्यात खास दिवस...!

हा व्हि़डिओ शेअर करण्यामागे एक खास कारण आहे. मधुराणीच्या लेकीचा आज वाढदिवस आहे. तिचं नाव स्वरा आहे. अनेकदा मधुराणी लेकीसोबत कविता सादर करताना दिसते. या दोघींची सुरेल मैफिल चाहत्यांना देखील आवडते. मधुराणीला गायनाची आणि कविता वाचनाची आवड आहे. 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका