'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. ते दोघे कधी लग्न करतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. अभिषेकने अनघाशी प्रतारणा केल्याचे देशमुख कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसतो. हा धक्का अनघालाही सहन होत नाही आणि ती बेशुद्ध पडते. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. दरम्यान मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यातून समजते आहे की, देशमुखांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाले आहे.
मालिकेत अनघाच्या डोहाळे जेवणादरम्यान अरुंधती सगळ्यांसमोर अभीचा पर्दाफाश करते. ते ऐकून घरांतल्यासोबत अनघाला खूप मोठा धक्का बसतो. ती बेशुद्ध होते. अनघाच्या गरोदरपणात आधीपासूनच कॉम्प्लिकेशन होते. त्यामुळे तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, अनघाची प्रकृती आणखी बिघडणार का, तिचं बाळ सुखरूप असेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. मात्र आता मालिकेच्या नवा प्रोमो समोर आला आहे.
मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार अभि आणि अनघाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिच्या येण्याने सगळेच खुश आहेत. अनघाही सुखरुप आहे. अरुंधती अनघा आणि बाळाचं देशमुखांच्या घरात स्वागत करताना दिसणार आहेत. अरुंधती बाळाची दृष्ट काढत असताना तिला अभि तिला रोखतो. जिची दृष्ट लागते तिनेच दृष्ट कशाला काढायची असं तो म्हणतो. पण अनघा अरुंधतीला पाठींबा देते आणि बाळाला तिच्याकडे सोपवते.बाळाच्या येण्याने देशमुखांच्या घरात आनंदच वातावरण आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.