Join us

'आई कुठे काय करते' मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस, अरुंधती भावुक; ईशा आणि अभिषेकला मिठी मारुन रडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:53 IST

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ समोर आला आहे. मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटली. तर देशमुख कुटुंबीयांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेत आहे. या मालिकेचं शूटिंगही संपलं आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधती ही भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. शूटिंग संपल्यानंतर सगळे टाळ्या वाजवत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर कलाकार भावुक झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अरुंधती ईशा आणि अभिषेकला मिठी मारुन रडत असल्याचंही दिसत आहे. 

२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते'  मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेl मधुराणी प्रभुलकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. तर अपूर्वा गोरे ईशा आणि निरंजन कुलकर्णी अभिषेकच्या भूमिकेत होते. रुपाली भोसले, अभिषेक देशमुख, मिलिंद गवळी अशी या मालिकेची स्टारकास्ट होती. आता ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता