'आई कुठे काय करते' मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा ५ वर्षांचा प्रवास आता संपणार आहे. १ डिसेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होईल. अशातच 'आई कुठे काय करते' मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकरने तिच्या भावना व्यक्त केल्यात. पूनमने मालिकेच्या सेटवरचा फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, ""विशाखा " लव्ह you काळजी घे.. 5 वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला .(थांबला नाही म्हणणार.. ) इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात..."
पूनम पुढे लिहिते की, "जिची कुठेही शाखा नाही अशी "विशाखा "असं गमतीमध्ये रवी सर, आप्पा किशोर महाबोलेंना बोलायचे . "आई कुठे काय करते " काल शूटिंगचा शेवटचा दिवस ... रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं .. ही packup ची घाई, हा आवाज , ही वास्तू, script, क्लोज साठी makeup touchup करून रेडी होणं ,कॉस्च्युम , तयारी आणि बरंच ... बरंच काही काल समृद्धी बंगल्यात मध्ये थांबल... आणि मग पहिला दिवस ते आजचा दिवस सगळं डोळ्यासमोरून येऊन गेल... या मालिकेने , समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरच खूप समृद्ध केलं.. शेवटचं तिथे मस्त टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला.. Thanks universe"
पूनम पुढे लिहिते की, "आमच्या प्रोजेक्ट head नमिता वर्तक, मुग्धा गोडबोले यांच्या लेखणीतून विशाखा तयार झाली आणि मग रवी सर, सुबोध सर ,तुषार विचारे यांच्या मार्गदर्शनाने तिने आकार घेतला.. अगदी कुठेही गेलं तरी विशाखा या नावाने सगळे ओळखतात.. लॉकडाऊन मध्ये तर डोळे आणि आवाजावरूनही तोंडावर mask असतानाही "विशाखा आत्या "ही हाक आली की समाधानाने भरून पावत होते." पुढे पूनमने मालिकेच्या पडद्यामागील सर्व तंत्रज्ञांचे आभार मानले आहेत.
पूनम शेवटी लिहिते की, "प्रत्येक डिपार्टमेंटचे तसेच सर्व कलाकारांचे मी आभार मानते. ज्यांनी मला या सर्व प्रवासात सांभाळून घेतलं. आणि कांगोरे असलेले आई कुठे काय करते हे नेहमी मनाच्या कोपऱ्यात आढळ स्थानावर राहील.. आणि ह्या सगळ्यात विशाखा या कॅरेक्टर वर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार असच प्रेम करत रहा तुमचा आशीर्वाद असू दे.." अशाप्रकारे पूनमने भावुक पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्यात