‘आई कुठे काय करते’ अंकिता अभीशी लग्न करुन आल्यामुळे घरातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अभी अंकिताला बोलतो की, आजी आप्पा अजूनही आपलं लग्न ग्राह्य धरत नाहीत. आपण मुंबईला असतो तर त्यांनी पुन्हा आपलं लग्न लावून दिलं असतं. हे घर लहान आहे आणि हे सगळं अचानक झालं आहे, थोडा वेळ द्यावा लागेल सगळ्यांना, घरच्यांना, अंकिता म्हणते अभी मग मी किती दिवस लांब राहायाचं तुझ्यापासून ? अभी बोलतो दहा बारा दिवस तरी...यानंतर अंकिता बोलते मग आपण एका हॉटेलमध्ये राहायला जाऊयात का? इथे खूप गरम होतं. त्यात मला जमीनीवर झोपायची सवय नाही...अभी बोलतो या कारणासाठी आपण दोघांनीच हॉटेलमध्ये जाऊन राहणं वाईट दिसेल.
इकडे आज्जीला स्वप्न पडतं की अंकिता आणि संजना तिला मारून टाकण्याचा, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतायत. इतक्यात आप्पा तिथे येतात आणि तिला झोपेतून जागं करतात बसल्या बसल्या झोपली होतीस तू, तू स्वप्न बघत होतीस का? असं विचारून आप्पा आजीच्या मनातली भीती दूर करतात. आजी अंकिताकडून पायाची मालिश करुन घेताना दिसते. हे पाहून आप्पा यश आणि ईशाला म्हणतात आज्जी अंकिताला बरोबर सरळ करुन ठेवणार.
यानंतर यश अभीला अनघाला फोन करून तिच्याशी एकदा बोलण्याचा सल्ला देतो. इतक्यात अनिरुध्द तिथे येतो आणि म्हणतो की कशाला करायला पाहिजे फोन. यश म्हणतो कारण अभी अनघाला उत्तर द्यायला बांधील आहे. अनिरुध्द बोलतो आता अभीचं लग्न झालंय. अनघाचा विचार करणं आता योग्य नाहीए. यश म्हणतो बाबा तुम्ही त्याला चुकीचा सल्ला देताय.. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं.
आजी सगळ्यांन सागंते की उद्या आपल्याकडे अंकिता आणि अभीच्या लग्नानिमित्त पूजा आहे. पूजेची तयारी अरुंधती करेल. अरुंधती म्हणते मग स्वयंपाक कोण करेल? यावर आजी म्हणते अंकिता आणि संजना करेल.