Join us

"आलेच मी...!" अमृता खानविलकर थिरकली सईच्या 'देवमाणूस'मधील लावणीवर, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:31 IST

Amruta Khanvilkar : देवमाणूस सिनेमात 'आलेच मी' या लावणीवर सई ठसकेबाज लावणी करताना दिसणार आहे. दरम्यान आता या गाण्यावर मराठमोळी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर थिरकली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) खूप चर्चेत आली आहे. यावेळेला ती कोणत्याही ग्लॅमरस फोटोंमुळे किंवा आगामी प्रोजेक्टमुळे नाही तर लावणी डान्समुळे चर्चेत आली आहे. ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर लावणी करताना दिसणार आहे. 'देवमाणूस' (Dev Manus Movie) सिनेमात आलेच मी या लावणीवर सई ठसकेबाज लावणी करताना दिसणार आहे. हे गाणे रिलीज झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या या गाण्यावर सोशल मीडियावर रिल पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता या गाण्यावर मराठमोळी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) थिरकली आहे. तिच्या डान्सला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

अमृता खानविलकर हिने नुकतेच नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलसोबत आलेच मी या लावणीवर ठुमके लगावले आहेत. या गाण्यावरील अमृताचे दिलखेचक अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. इतकेच नाही तर सई ताम्हणकर हिने देखील या डान्सवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हाये...अशी कमेंट केलीय. मृण्मयी देशपांडेने कमाल अशी कमेंट केलीय. नेहा खानने फायर इमोजी शेअर केली आहे. 

'देवमाणूस' सिनेमाबद्दल‘देवमाणूस’ या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे हे प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २०२२ साली प्रदर्शित झालेल्या वध सिनेमावर बेतलेला आहे. या सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होते. लव फिल्म्सचे सादरीकरण असलेल्या ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होईल.

टॅग्स :अमृता खानविलकरसई ताम्हणकर