Join us

आमिर अली आणि संजिदा शेखच्या ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आली ही धक्कादायक बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 16:39 IST

आमिर आणि संजिदाच्या ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ठळक मुद्देआमिर आणि संजिदा यांना चार महिन्यांची मुलगी असल्याचे वृत्त बिझनेस टाइम्सने दिले आहे. त्यांना मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झाली होती असे त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे.

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आमिर अली आणि संजीदा शेख यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कुटुंबियांच्या संमंतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2012 मध्ये आपल्या नात्याला नवीन ओळख देत लग्नबंधनात अडकले. मात्र आता यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. एवढेच नव्हे तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे. अद्याप दोघांनी घटस्फोट घेतलेला नसला तरी लवकरच संजीदा आमिरला घटस्फोट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर आणि संजिदाच्या ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमिर आणि संजिदा यांना चार महिन्यांची मुलगी असल्याचे वृत्त बिझनेस टाइम्सने दिले आहे. त्यांना मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झाली होती असे त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे. आता त्यांना खरंच मुलगी आहे की ही केवळ अफवा आहे हे केवळ आमिर आणि संजिदाच सांगू शकतात. तसेच त्यांना मुलगी असल्यास ही गोष्ट त्यांनी सगळ्यांपासून का लपवून ठेवली हा देखील प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. 

सोशल मीडियावर या दोघांचे रोमांटीक फोटो इतरांना जरी कपल गोल देत असले तर रिअर लाईफमध्ये मात्र यांचे नाते फेल ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे दोघे वेगळे होणार या बातमीनेच त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहे.

संजीदा शेखने 'क्या होगा निम्मो का' या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती आज अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. ती गेल्या काही वर्षांत 'जाने पहचाने से अजनबी', 'एक हसिना थी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तसेच आमिरने देखील अनेक हिट मालिका दिल्या आहेत.

टॅग्स :आमिर अलीसंजीदा शेख