Join us

Shocking! छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध कपलने लग्नाच्या 9 वर्षानंतर घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:46 IST

टीव्हीच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 8' (Nach Baliye 8) सीझनची ही जोडी विजेती आहे.

लोकप्रिय टीव्ही कलाकार आमिर अली आणि संजीदा शेख  (Sanjeeda Shaikh Aamir Ali  Divorce)  यांचा घटस्फोट झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, यावर आमिर किंवा संजीदा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे म्हटले जात आहे की हे जोडपे त्यांच्या विभक्त होण्याची अधिकृत घोषणा देखील करणार नाहीत. मात्र या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने याबाबत माहिती दिली आहे.

हिंदुस्तान लाइव्हच्या बातमीनुसार, एका सूत्राने सांगितले की, “घटस्फोटाची कागदपत्रे येऊन जवळपास नऊ महिने झाले आहेत. ते आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत.  दोघेही प्रायव्हसी मेन्टेंन करतायेत. त्यामुळे घटस्फोटाबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करू इच्छित नाही.”

2012मध्ये झाले होते लग्न आमिर अली आणि संजीदा शेख यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्न केले होते. 2020 मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. दोघे वेगळे राहत असल्याचे बोलले जात होते. त्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, हे देखील उघड झाले की या जोडप्याला चार महिन्यांचे सरोगेट बाळ आहे. दोघांनी एकत्र टीव्हीच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 8' मध्ये भाग घेतला होता. 

टॅग्स :आमिर अलीटिव्ही कलाकारसंजीदा शेख