Join us

शाहरुख खानच्या 'डंकी'साठी आमिर खाननेही दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:03 IST

शाहरुखच्या चित्रपटाविषयी काय म्हणाला आमिर खान?

'मु्न्नाभाई एमबीबीएस', '3 इडियट्स', 'PK','संजू' असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक निर्माते राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांना इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचा आगामी 'डंकी' (Dunki) सिनेमा रिलीज होतोय. पहिल्यांदाच शाहरुख खान (Shahrukh Khan) त्यांच्या सिनेमात झळकणार आहे. २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) राजकुमार हिरानींना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने शाहरुख आणि डंकीचाही उल्लेख केला आहे. 

काय म्हणाला आमिर खान?

आमिर खानने राजकुमार हिरानींच्या '3 इडियट्स' आणि 'PK' मध्ये काम केले आहे. हिंदी सिनेमातील सुपरहिट सिनेमांमध्ये हा दोन्ही सिनेमांची गणना होते. आपल्या आवडत्या दिग्दर्शकाला शुभेच्छा देताना आमिर म्हणाला,'हिरानी माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. राजू, इंडस्ट्रीत तुझे २० वर्ष पूर्ण झाले आहेत. खूप शुभेच्छा आणि तुझा २१ डिसेंबरला डंकी रिलीज होतोय. आम्हाला सर्वांनाच या सिनेमाची उत्सुकता आहे. तसंच शाहरुख आणि तू दोघांनी एकत्र येत काय जादू केली आहे हेही पाहायचं आहे. डंकी साठी खूप खूप शुभेच्छा. कामयाबी तेरे कदम चूमेगी क्योकी तू काबिलियत के पिछे दौडता है.'

सोबतच शाहरुखनेही राजकुमार हिरानींना शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला,'राजू सर, २० वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा. तुमचे चित्रपट पाहूनच मोठे झालो आहोत. मुन्नाभाई, पीके आणि ही लिस्ट अशीच वाढत राहुदे. जगाला गोष्टी सांगत राहा. याशिवाय रणबीर कपूर, आर माधवन, विकी कौशल, तापसी पन्नू, विद्या बालन, शर्मन जोशी यांनीही राजकुमार हिरानी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानआमिर खानबॉलिवूडसिनेमाडंकी' चित्रपटराजकुमार हिरानी