Join us

आमीर खानने केले पिंजराचे कौतुक

By admin | Updated: March 26, 2016 02:34 IST

मराठी इंडस्ट्री भरारी घेत आहे. याच इंडस्ट्रीला पुन्हा एकदा चार चॉद लागले आहेत. नुकतेच बॉलीवुडचा परफेक्टनीस आमिर खाने याने पिंजरा या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पिंजरा या चित्रपटाने

मराठी इंडस्ट्री भरारी घेत आहे. याच इंडस्ट्रीला पुन्हा एकदा चार चॉद लागले आहेत. नुकतेच बॉलीवुडचा परफेक्टनीस आमिर खाने याने पिंजरा या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पिंजरा या चित्रपटाने गेली ४४ वर्ष मराठी मनावर राज्य केले आहे. आज पुन्हा दिग्दर्शक व्ही शांताराम यांची एक उत्कृष्ट कलाकृती असलेला पिंजरा नव्यानं प्रदर्शित झाला आहे. याबाबत अभिनेता आमीर खाननं ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे. तसंच हा चित्रपट पाहणार असल्याचं देखील आमीरने म्हटलं आहे. व्ही शांताराम यांची शेवटची कलाकृती म्हणजे पिंजरा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याचं समजलं. व्ही शांताराम यांच्यासारख्या महान दिग्दर्शकाची कलाकृती पाहण्याची संधी वारंवार येत नाही. ही संधी मी सोडणार नाही, पण तुम्हीही सोडू नका असं ट्विट आमीरने केलं आहे. अभिनेते श्रीराम लागू आणि संध्या यांचा अभिनय, राम कदम यांचं संगीत आणि दमदार लावणीच्या नृत्यानं रंगतदार ठरलेला हा चित्रपटआजही रसिकांच्या मनाला भुरळ घालत आहे. १८ मार्च रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा डॉल्बी साऊंडसह प्रदर्शित करण्यात आला आहे.