बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट मिस्टर आमिर खा(Aamir Khan) सध्या मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. 'लाल सिंग चड्डा' बॉक्सऑफिसवर आपटल्यानंतर त्याला चांगलाच फटका बसला आहे. सध्या तो माध्यमांसमोरही येणं टाळतो. लवकरच आमिरची लेक ईरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या तो लेकीच्या लग्नाच्या तयारित व्यस्त आहे. तसंच त्याचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याच दरम्यान आमिरने एक चांगलं काम करत लोकांचं मन जिंकलं आहे.
आमिर खान सामाजिक कार्य करण्यात नेहमी पुढे असतो. हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. सध्या हिमाचल प्रदेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे अनेक कुटुंबिय प्रभावित झाले आहेत. आमिरने पुढाकार घेत पुरामुळे प्रभावित कुटुंबाना मदत केली आहे. यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत आमिर खानचे आभार मानले आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या खुलाश्यानुसार बॉलिवूड सुरस्टारने राज्य सरकारद्वारे तयार केलेल्या आपातकालीन सहायता योजनेत २५ लाखांचे दान दिले आहे. त्यांनी आमिरचे आभार मानले आहेत. तसंच ही मदत प्रभावित कुटुंबापर्यंत पोहोचेल असं आश्वासनही दिलं आहे. यापूर्वी आमिरने हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सिनेमांचं शूटिंग केलं आहे. या कठीण प्रसंगी आपल्या कर्तव्याची जाण राखत आमिर खान पुढे सरसावला आहे.