Join us

7 वर्षांत इतकी बदलली 'दंगल'मधली आमिर खानची ऑनस्क्रीन मुलगी बबिता, दिसतेय फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 7:00 AM

दंगल' चित्रपटात आमिरची धाकटी मुलगी बबिता फोगटची भूमिका करणारी अभिनेत्री आता बरीच मोठी झाली आहे. तिचा लूकही पूर्णपणे बदलला आहे.

Suhani Bhatnagar Dangal Babita Phogat: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात आमिरची धाकटी मुलगी बबिता फोगटची भूमिका करणारी अभिनेत्री सुहानी भटनागर(Suhani Bhatnagar)आता मोठी झाली आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या सुहानीचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हाला ही विश्वास बसणार नाही की ती हीच दंगलमधील छोटी बबिता आहे. जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

सुहानी भटनागरला 'दंगल' (Dangal) चित्रपटाने रातोरात स्टार बनवले. या चित्रपटात सुहानीने आमिर खानच्या धाकट्या मुलीच्या भूमिकेत दमदार अभिनय केला होता. या चित्रपटात भारतीय कुस्तीपटू बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी सुहानी आता मोठी झाली आहे. तिचे लेटेस्ट फोटो सुहानी भटनागरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल की दंगलमध्ये लहान आणि निरागस दिसणारी बबिता आता इतकी बदलली आहे. एवढेच नाही तर सुहानीचा लूकही आता बदलला आहे. 

6 वर्षांपूर्वी आलेल्या 'दंगल'मध्ये सुहानी भटनागर(Suhani Bhatnagar)नं छोटी बबिताच्या भूमिकेत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. इतकंच नाही तर एका मीडिया इंटरव्यूमध्ये आमिर खानने खुलासा केला होता की इतक्या लहान वयात सुहानी खूप मेहनती आहे. सुहानी भटनागरचे इन्स्टाग्रामवर 18.2 हजार फॉलोअर्स आहेत. मात्र, सुहानी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

टॅग्स :आमिर खान