बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरीदेखील नेटकऱ्यांमध्ये त्याची कायम चर्चा रंगत असते. यात अनेकदा तो त्याच्या लेकीमुळे चर्चेत येतो. आमिरची लेक आयरा खान (ira Khan) सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा ती तिच्या वैयक्तिक जीवनाची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने तिला आलेल्या एंग्याजयटी अटॅकविषयी भाष्य केलं.
अलिकडेच आयराने सोशल मीडियावर तिचा नो मेकअप लूक मिरर सेल्फी शेअर केला. यावेळी तिने या फोटोसह तिला आलेल्या एंग्याजयटी अटॅकविषयी भाष्य केलं. सोबतच एंग्याजयटी अटॅकची लक्षणं कोणती हे देखील तिने सांगितलं.
आमिर खानच्या थोरल्या लेकाला कधी पाहिलंय का? वडिलांप्रमाणेच आहे 'परफेक्ट'
"मला एंग्याजयटी अटॅक येऊ लागले आहेत. त्यामुळे माझा जीव प्रचंड घाबरा व्हायचा पण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायचे. खूप रडायचे. मात्र, यापूर्वी मला कधीच एंग्याजयटी अटॅक आलेला नाही. पॅनिक आणि पॅनिक अटॅक मधलं जे अंतर असतं. तसंच काहीसं अंतर एंग्याजयटी आणि एंग्याजयटी अटॅकमध्ये असतं", असं आयरा म्हणाली.
एंग्याजयटी अटॅकची ही आहेत लक्षणं"एंग्याजयटी अटॅकविषयी मला जितपत समजतंय त्यानुसार, याची काही लक्षण आहेत. यात प्रचंड भीती वाटणे वा जोरजोरात छातीत धडधड होणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, याशिवाय, रडू कोसळणे अशी लक्षणं जाणवतात. आणि एक वेळ अशी येते की जसं काय खूप मोठं संकट आपल्यावर कोसळलं आहे", असंही आयरा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला नाही माहित की पॅनिक अटॅक नेमका कसा असतो. पण, जो प्रकार माझ्यासोबत होतोय तो फार विचित्र आहे. आणि, जर माझ्यासोबत हे वारंवार होत असेल तर मला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल असा सल्ला माझ्या डॉक्टरांनी दिला आहे. मला अटॅक आल्यानंतर श्वासावर नियंत्रण मिळवल्यावर मला काही काळ बरं वाटतं. मात्र, जर मी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे चिंतेत असेन तर मला त्रास होतो."
दरम्यान, आयराची ही पोस्ट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी तिला काही टिप्सदेखील दिल्या आहेत. आयरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम तिच्या आरोग्याविषयीचे खुलासे जाहीरपणे करत असते.