सध्या सलमान खानच्या घरावरील गोळीबर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी आज गुजरातमधून अटक केली आहे. सध्या भाईजानचे फॅन्स या प्रकरणाची चांगलीच चर्चा करत आहेत. अशातच या प्रकरणानंतर आमिर खानने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत FIR नोंदवला आहे. यामागचं एक वेगळंच कारण समोर आलंय. जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
झालं असं की, सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. अशातच आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात एका राजकीय पक्षाचा खोटा प्रचार करणारं कॅप्शन वापरुन आमिरचा व्हिडीओ व्हायरल केलाय. खरंतर व्हिडीओचा विषय वेगळा आहे. परंतु हा व्हिडीओ राजकीय पक्षाशी जोडला गेलाय, व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की आमिरचा आवाज डब केलाय. याप्रकरणी आमिरने पोलिसांत धाव घेतली आहे.
आमिर आणि त्याच्या टीमला हे कळताच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवला आहे. याविषयी आमिर खानने अधिकृत वक्तव्य जाहीर केलंय की, "माझ्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला नाही." हा डीपफेक व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आमिरने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलीस आरोपींंवर कारवाई करणार का हे पाहायचं आहे.