Laal Singh Chaddha:आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लालसिंग सिंग चड्ढा या महिन्यात प्रदर्शित होतोय. पण, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाविरोधात बायकॉट मोहिम राबवली जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. तसेच, #BoycottLaalSinghCaddha हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. चित्रपटाबाबत निर्माण होत असलेल्या नकारात्मक वातावरणावर होते आहे.
आमिर खान लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालू नये, अशी विनंती त्याने केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिर खानने मीडियाशी संवाद साधला आणि आपल्या चित्रपटात केलेल्या बदलांबद्दल सांगितले. आमिर खान म्हणाला की, चित्रपटाच्या साऊथ स्क्रीनिंगमध्ये बदल करण्यात आले आहेत.
आमिर खानने साऊथचे सुपरस्टार एसएस राजामौली, नागार्जुन आणि चिरंजीवी यांना आपला चित्रपट लाल सिंग चड्ढा दाखवला. या चित्रपटाबद्दल त्यांनी साऊथ स्टारच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यानंतर आमिर खान म्हणाला की, जर हिंदी प्रेक्षक तेलगू, तामिळ आणि इतर भाषांमधील चित्रपटांचे स्वागत करू शकत असतील तर साऊथमधील प्रेक्षकाही आमच्या सिनेमांचं स्वागत करतील.
आमिर खानने सांगितले की, या चित्रपटाच्या एका वेळी साऊथच्या सर्व स्टार्सची एकच प्रतिक्रिया होती. आमिर म्हणाला तो मुद्दा मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्यानंतर आम्ही लाल सिंग चड्डामध्ये काही बदल केले आणि तो बदल अगदी खरा होता. मात्र, चित्रपटात करण्यात आलेले बदल त्याने सांगितला नाही. लाल सिंह चड्ढा 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.