Join us

ना धिंगाणा ना शोबाजी! आमिर खान किरण राव अन् छोट्या आझादने गायली हिंदी गाणी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 09:55 IST

छोट्या आजाद खानने गायलं 'एक हजारो मे मेरी बहना है', तर आमिर खानने किरण रावसह गायली जुनी हिंदी गाणी

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईत रजिस्टर मॅरेज केलं. तर आता त्यांचा ग्रँड विवाहसोहळा उदयपूर येथे पार पडत आहे. काल त्यांचा संगीत सोहळा पार पडला. ना शोबाजी ना कोणता बडेजाव दाखवता आमिर खानने अगदी साध्या पद्धतीने लेकीच्या संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं. स्वत: जुनी हिंदी गाणी गाऊन आमिर खानने रंगत आणली. या सुंदर संगीत सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सध्या आयरा आणि नुपूरच्या संगीत, मेहंदी सोहळ्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत. काल रात्री झालेल्या या संगीत फंक्शनमध्ये आमिर खान, एक्स वाईफ किरण राव आणि मुलगा आझाद (Azad Khan) गाणं म्हणताना दिसत आहेत. तिघेही स्टेजवर बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर माईक आहे. बाजूला एक महिला पेटी वाजवतानाही दिसत आहे. 'आ चलके तुझे मै लेके चलूँ...' आणि 'एक प्यार नगमा है...'ही गाणी गाताना दिसत आहेत. तर आजादने आपल्या बहिणीसाठी 'एक हजारो मे मेरी बहना है' हे गाणं गायलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर हे व्हिडिओ हिट आहेत. इतर बॉलिवूड कलाकारांच्या संगीत सोहळ्यापेक्षा हा सोहळा खूपच वेगळा असल्याने आणि आमिर खानला गाताना बघून चाहते खूश झालेत. शिवाय आमिर खानचा छोटा मुलगा आणि आयराचा सावत्र भाऊ आजादनेही गाण्यातून सर्वांचं मन जिंकलं आहे. 

आमिर खानची लेक आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखारे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयराच्या लग्नात आमिर खानच्या दोन्ही एक्स वाईफ रिना दत्ता आणि किरण राव दिसल्या. आयरा आमिर आणि रीना दत्ताची मुलगी आहे. आयराच्या लग्नाच्या निमित्तानेो सध्या या कुटुंबाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टॅग्स :इरा खानआमिर खानकिरण रावलग्नसोशल मीडिया