अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान हिला अॅक्टिंगमध्ये म्हणजे अभिनेत्री होण्यात काहीही इंटरेस्ट नाही. तिला रस आहे तो चित्रपट दिग्दर्शनात. आमिरचा मुलगा जुनैद हाही थिएटरमध्ये बिझी आहे. चित्रपटांपेक्षा त्याला थिएटरमध्ये अधिक रस आहे. पण आमिरच्या कुटुंबातील एका मुलीचा मात्र कधीच डेब्यू झालाय. होय, तिचे नाव जायन मरी खान. ही कोण तर आमिरची पुतणी. म्हणजेच आमिरचा चुलत भाऊ मन्सूर खान याची मुलगी.
अलीकडे जॅकलिन फर्नांडिस व मनोज वाजपेयी स्टारर ‘मिसेज सीरिअल किलर’ या नेटफ्लिक्स ओरिजनल फिल्ममधून तिने डेब्यू केला.
हा सिनेमा रिलीज झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांनी फार प्रतिसाद दिला नाही, पण जायनमुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या डिजिटल प्रीमीअरला आमिर, किरण राव, इरा व जायन उपस्थित होते.
आमिर खानची मुलगी इरा आणि जायन यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. जायनचा पहिला सिनेमा रिलीज झाल्यावर इराने तिच्याबद्दल एक खास पोस्ट शेअर केली होती.
जायन ही सोशल मीडियावर प्रचंड अॅॅक्टिव्ह आहे. यापूर्वी तिने दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासोबत ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटासाठी अस्टिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले.
जायनचे वडिल मन्सूर खान हे बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘कयामत से कयामत तक’ या सुपरडुपर चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. यात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. ‘जो जिता सिकंदर’ हा आमिरचा सिनेमा त्यांनीच दिग्दर्शित केला होता. यानंतर आमिरसोबतच ‘अकेले हम अकेले तुम’ हा सिनेमा त्यांनी बनवला होता. यात मनीषा कोईराला लीड भूमिकेत होती.