Aamir on Laal Singh Chaddha: अभिनेता आमिर खान 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. आमिर चित्रपट करण्यासाठी दोन वर्षांचा वेळ घेतो आणि त्यात तो जीव ओतून काम करतो. लेखनापासून ते दिग्दर्शन आणि गाण्यांपर्यंत, प्रत्येक पैलूवर त्याचे बारकाईने लक्ष असते. चित्रपटाचे प्रमोशनही तो वेगळ्या अंदाजात करत असतो. पण, गेल्या काही काळापासून तो प्रेक्षकांची नाडी ओळखू शकलेला नाही. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फ्लॉप झाल्यानंतर तो 'लाल सिंग चड्ढा' घेऊन आला, पण या चित्रपटानेही प्रेक्षकांची निराशा केली.
वितरकांचे पैसे परत करणारहॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप'चे हक्क मिळवण्यासाठी आमिरने खूप प्रयत्न केले होते. हक्क मिळवल्यानंतर चित्रपट बनवतानाही त्यांने प्रचंड मेहनत केली. अनेक वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करत होता. पण, चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली असून, पाच दिवसात केवळ 48 कोटींची कमाई करू शकला आहे. या अपयशानंतर आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिरने आता वितरकांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिरला जबरदस्त धक्काबॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि त्याची माजी पत्नी किरण राव यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, आमिरने या चित्रपटावर खूप मेहनत घेतली होती. पण, प्रेक्षकांनी चित्रपट नाकारल्याने आमिरला जबरदस्त धक्का बसला आहे. चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आहे. यामुळेच त्याने वितरकांचे नुकसान भरुन काढण्याचा निर्णय घेतलाय.