अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या गर्लफ्रेंडमुळे मध्यंतरी चर्चेत आला होता. वयाच्या ६० व्या वर्षी आमिर ४६ वर्षीय गौरी स्प्रॅटच्या (Gauri Spratt) प्रेमात पडला आहे. गौरीचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. गेल्या दीड वर्षांपासून दोघं सोबत आहेत. काही दिवसांपूर्वी आमिरने त्याच्या वाढदिवशी पापाराझींसमोर गौरीची ओळख करुन दिली. तर आता तो तिच्यासोबत हातात हात घालून वावरताना दिसत आहे. नुकतंच आमिर, त्याचा मुलगा जुनैद, गौरी यांच्यासोबत शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो समोर आला आहे.
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन सध्या त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बऱ्याचदा दिसून येतो. सोफी शाइन असं तिचं नाव आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यामध्ये आमिर खान त्याच्या लेडीलव्ह गौरी स्प्रॅटसोबत दिसत आहे. शिवाय जुनैद खानही फ्रेममध्ये आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर छान स्माईल असून त्यांनी ग्रुप फोटोसाठी पोज दिली आहे. आमिरने ग्रे रंगाचा कुर्ता घातला आहे तर गौरी लाईट रंगाच्या शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये छान दिसत आहे. जुनैद खान ब्लॅक टीशर्ट घालून कॅज्युअल लूकमध्ये दिसतोय. तर शिखर धवन पर्पल रंगाच्या टीशर्टमध्ये स्पोर्टी लूक देत आहे. त्याची गर्लफ्रेंड ब्लॅक आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. 'सुंदर संध्याकाळ' असं तिने कॅप्शन दिलं आहे.
आमिर खान काही दिवसांपूर्वी मकाऊ कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये गेला होता. तिथेही त्याने गौरीला सोबत नेले होते. गौरीची ओळख जगजाहीर केल्यानंतर आता आमिर तिच्यासोबत सर्रास कॅमेऱ्यासमोर येत आहे. तसंच लवकरच आमिर 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात शिखर धवनही दिसणार अशी चर्चा मधल्या काळात रंगली होती. मात्र आमिर आणि तो मित्र आहेत म्हणून त्यांच्यात कधी कधी भेट होते असं त्याने स्पष्टीकरण दिलं होतं. गेल्या वर्षी आमिरच्या घरी आयोजित केलेल्या कव्वाली नाईटमध्ये शिखर धवनही सहभागी झाला होता.