कोरोना महामारीमुळे जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले. मनोरंजन विश्वालही कोरोना महामारीचा मोठा फटका बसला. अर्थात हळूहळू स्थिती पूर्वपदावर येतेय. शूटींग सुरु झाले आहे. चित्रपटगृहे खुली झाली आहेत. सुमारे 8 महिन्यानंतर चित्रपटगृहांमध्ये ‘सूरज पे मंगल भारी’ हा पहिला सिनेमा रिलीज झाला. चित्रपटगृहांत जाऊन हा सिनेमा पाहण्यास प्रेक्षक फार उत्सुक दिसले नाहीत. पण बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान मात्र मुलगी इरा खानसोबत हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचला. मात्र नेमक्या याच कारणामुळे आमिर ट्रोल झाला.
आमिरने स्वत: ‘सूरज पे मंगल भारी’ हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांत जात असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. ‘दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्याचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे,’ असे टिष्ट्वट त्याने केले. त्यानंतर आमिर चित्रपटगृहाबाहेर दिसतात पापाराझींचे कॅमेºयांनी एकच गर्दी केली. त्याची एक छबी कॅमे-यात कैद करण्यासाठी पापाराझी पुढे सरसावले. लोकांनीही त्याच्याभोवती गर्दी केली. आमिरचा हा पुढाकार नेटक-यांना मात्र खटकला. कोरोना संपलेला नाही. अशास्थितीत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे योग्य नाही, असे म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केले.
तू कितीही सपोर्ट कर, पण आता तर तुझा चित्रपट पाहण्यासाठीही थिएटरमध्ये जाणार नाही. सर्वांसाठी आरोग्य महत्त्वाचे आहे, असे एका युजरने यावर लिहिले. अन्य एका युजरनेही अशीच प्रतिक्रिया दिली. तुम्हीच एकमेकांचे सिनेमे पाहा. आम्हाला रिमेकवूडच्या सिनेमात काहीही रस नाही, असे या युजरने लिहिले.
‘सूरज पे मंगल भारी’ हा सिनेमा 13 नोव्हेंबरला रिलीज झाला. अभिषेक शर्माने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात दिलीजीत दोसांज, मनोज वाजपेयी, फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत.आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात आमिरसोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आमिर-करिश्माच्या ‘त्या’ किसींग सीनबद्दल दिग्दर्शकाने 24 वर्षानंतर केला खुलासा