बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. अभिनेता लवकरच रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकतेच आमिरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव आहे सितारे जमीन पर. या चित्रपटाची निर्मितीदेखील तोच करणार आहे.
५८ वर्षीय अभिनेता आमिर खानने न्यूज १८ इंडियाच्या अमृत रत्न २०२३च्या एका चर्चेदरम्यान या प्रोजेक्टबद्दल विचारले. त्यावेळी आमिर खान म्हणाला की, मी सितारे जमीन परमध्ये अभिनय आणि निर्मिती करत आहे. तारे जमीन परच्या थीमसोबत दहा पावलं पुढे जाणार आहे. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले होते, मात्र ही तुम्हाला हसवेल.
आमिर खान म्हणाला, 'त्या चित्रपटात मी दर्शीलच्या व्यक्तिरेखेला मदत केली होती, पण या चित्रपटात नऊ जण मला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतील.' 'तारे जमीन पर' हा आठ वर्षांच्या हुशार मुलावर आधारित सिनेमा होता. चित्रपटात, आमिरने त्याच्या कला शिक्षकाची भूमिका केली होती, ज्याला कळते की मुलाला डिस्लेक्सिया आहे आणि त्याला त्याची खरी क्षमता ओळखण्यास मदत होते.
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ब्रेक घेतलाआमिर खानने त्याचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र, तो निर्माता म्हणून सक्रिय आहे. याबद्दल बोलताना तो या कार्यक्रमात म्हणाला, "मी निर्माता म्हणून तीन चित्रपट करत आहे. किरण राव दिग्दर्शित मिसिंग लेडीज आहे. हा ५ जानेवारीला येत आहे. माझा मुलगा जुनैद (खान) सोबत आणखी एक चित्रपट 'लाहोर' आहे. राजकुमार संतोषी आणि सनी देओलसोबत १९४७. मी या सर्व चित्रपटांची वाट पाहत आहे.