Join us

१९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आमिर खानचा भाऊ फैजल खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 3:05 PM

बाल कलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ.

ठळक मुद्देगत १९ वर्षांपासून फैजल बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता तो पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, ‘फॅक्ट्री’ या चित्रपटात फैजल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर शारिक मिन्हाज दिग्दर्शित या चित्रपटातून तो सिंगर म्हणूनही डेब्य

बाल कलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतोय. फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ. ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण या चित्रपटाने फैजलला खरी ओळख दिली. अर्थात  ही ओळख फैजलला फार काळ टिकवता आली नाही, हा भाग वेगळा. 

गत १९ वर्षांपासून फैजल बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता तो पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, ‘फॅक्ट्री’ या चित्रपटात फैजल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर शारिक मिन्हाज दिग्दर्शित या चित्रपटातून तो सिंगर म्हणूनही डेब्यू करतोय. शारिकसोबत फैजलने दोन चित्रपट केले आहेत. पहिला म्हणजे, ‘चांद बुझ गया’ आणि दुसरा म्हणजे ‘चिनार ए दास्तान’. आता शारिकच्याच ‘फॅक्ट्री’मध्ये फैजलची वर्णी लागली आहे. साहजिकच फैजल जाम उत्सूक आहे.

‘फॅक्ट्री’ माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटासाठी मला एक गाणे गाण्यासाठी विचारण्यात आले आणि मला धक्का बसला. कारण मला गाण्याबद्दल काहीही ठाऊक नाही. पण माझा आवाज या गाण्याला साजेसा आहे, असे मला शारिकने सांगितले आणि मी प्रयत्न केला. हा प्रयत्न सोपा नव्हता. पण मी फायनल गाणे ऐकले आणि मला स्वत:च स्वत:चा अभिमान वाटला, असे फैजलने सांगितले.

२००७ मध्ये फैजल घरातून पळून गेल्याची खबर होती. काही दिवसानंतर तो सिजोफ्रीनिया नामक आजाराने पीडित असल्याची बातमी आली. केवळ इतकेच नाही तर आमिरने मला घरात कैद करून ठेवले आहे, असा आरोप करून फैजलने याकाळात खळबळ निर्माण केली. आमिर माझी संपत्ती हडपू इच्छितो, असेही त्याने म्हटले होते.  

टॅग्स :फैजल खानआमिर खान