Join us

'आमिरला माफ केलं पण ती घटना विसरणं शक्य नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 6:28 PM

Faissal khan: यापूर्वीदेखील दिलेल्या मुलाखतीत फैजलने आमिर व कुटुंबीयांवर काही आरोप केले होते.

ठळक मुद्देफॅक्ट्री' या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत फैजलचं वक्तव्य

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. लवकरच त्याचा 'फॅक्ट्री' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अलिकडेच फैजलने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आमिरविषयी नाराजी व्यक्त केली असून ती घटना विसरणं कधीच शक्य नाही असं तो म्हणाला आहे.

'आमिरला आज भलेही मी माफ केलं आहे. पण त्या काळी घडलेली ती घटना विसरणं कदापि शक्य नाही', असं म्हणत फैजलने २००७ साली झालेल्या कौटुंबिक वादावर भाष्य केलं आहे.

"आजही मी माझ्या कुटुंबासोबत ठराविक अंतर बाळगून आहे. आजच्या घडीला मी ईद किंवा अन्य शुभप्रसंगी घरातील प्रत्येकाला शुभेच्छा देतो. मात्र, आमच्यात एक ठराविक अंतर मी कायम ठेवलं आहे. एकेकाळी मी ज्या कठीण प्रसंगातून जात होतो. त्यावेळी आमिरने मला फोन केला होता. आणि, माझ्याकडे स्वाक्षरी अधिकार (Signatory rights) मागितले होते", असं फैजल म्हणाला.

पुढे तो म्हणतो,"त्यांच्या मते, मला वेड लागलं होतं आणि त्यामुळेच मी माझी काळजी घेऊ शकत नाही असं त्यांना वाटायचं. या घटनेनंतर मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकरणी मी आमिरला माफ करेन. पण जे घडून गेलं ते विसरु शकत नाही. आज कुटुंबासोबत माझे चांगले संबंध आहेत. पण मला सतत एका गोष्टीची भीती वाटते. ही भीती म्हणजे भूतकाळाचीच आहे."

दरम्यान, यापूर्वीदेखील दिलेल्या मुलाखतीत फैजलने आमिर व कुटुंबीयांवर काही आरोप केले होते. फैजलने 'प्यार का मौसम', 'कयामत से कयामत तक' 'मदहोश', 'मेला', 'बॉर्डर हिंदुस्तान का' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, फॅक्ट्री या चित्रपटातून तो पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटात रोली रायन मुख्य भूमिकेत झळकणार आहे.तर राज कुमार कनौजिया आणि रिब्बू मेहरादेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूड