बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद त्याच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्याने आपल्या 'महाराजा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. परंतु लॉकडाउन मध्ये त्याने स्वत: ला फॅट वरून फिट केले आहे. सोशल मीडियावर जुन्या फोटोसह लोक जुनैदचा नवीन लूक पोस्ट करत आहेत.
जुनैदच्या 'महाराजा' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा करत आहेत. 'अर्जुन रेड्डी' चित्रपट फेम अभिनेत्री शालिनी पांडे जुनैद बरोबर काम करणारआहे. या चित्रपटात शर्वरी वाघ व्यतिरिक्त 'पाताल लोक' फेम जयदीप अहलावतदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
असे म्हणतात की 'महाराजा' हा चित्रपट महाराज लिबेल प्रकरणावर आधारित आहे. सन १८६२ मध्ये एका धार्मिक विभागप्रमुखांनी एका वृत्तपत्राविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. जुनैद खान त्याच्या पहिल्या चित्रपटात पत्रकार करसनदासची भूमिका साकारणार आहे.
आमिर खानबाबत बोलायचे झाले तर तो लवकरच लाल सिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत करिना कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.