Join us

३० वर्षांत तुटले आमिर खानची दोन लग्नं, 'लगान'च्या सेटवर किरण रावसोबत जुळले होते सूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 1:02 PM

आमिर खान आणि किरण राव यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहते हैराण झाले आहेत.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी १५ वर्षांपूर्वी लग्न केले होते. आमिर आणि किरणने वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमचे व्यावसायिक संबंध कायम राहतील. याशिवाय आम्ही आमच्या मुलांचे पालन पोषण मिळून करणार आहे.

किरण रावने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात आमिर खानचा चित्रपट लगानमधून सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकरने केले आहे. त्यानंतर किरणने आशुतोषचा चित्रपट स्वदेशमध्ये त्याच्यासोबत सहायक म्हणून काम केले. किरणने दिल चाहता है चित्रपटात केमिओदेखील केला होता. लगान चित्रपटाच्या दरम्यान आमिर खान पहिल्यांदा किरण रावला भेटला होता.

आमिर खानच्या खासगी आयुष्यात खूप चढउतार आले होते. आमिर खानने त्याच्या बालपणीची मैत्रिण रीनासोबत लग्न केले, मग लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर आमिर खानच्या जीवनात किरण रावची एन्ट्री झाली.

किरण रावच्या भेटीवर एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते की, लगान चित्रपटाच्या दरम्यान किरण फक्त माझ्या टीममधील सदस्य होती. तेव्हा की सहायक दिग्दर्शक होती. रिनाला घटस्फोट दिल्यानंतर किरणला भेटलो. त्यावेळी ती माझी चांगली फ्रेंडदेखील नव्हती, घटस्फोटानंतर तो ट्रॉमामधून जात होता. यादरम्यान एक दिवस त्याला किरणचा फोन आला.

आमिर खानने पुढे सांगितले होते की, किरणसोबत जवळपास मी अर्धा तास बातचीत केली. तिच्यासोबत बोलून मला खूप चांगले वाटत होते. त्या कॉलनंतर आम्ही दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. मोठ्या काळाच्या मैत्रीनंतर मला वाटू लागले की तिच्याशिवाय माझ्या जीवनात कोणीच नाही. मग आम्ही आमच्या नात्याला नाव दिले आणि २००५ साली लग्न केले.

निर्माती, दिग्दर्शिका, पटकथा लेखिका आणि आमिर खानची पत्नी किरण राव शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी आता तेलंगणा राज्यात आहे. किरण राव अदिती राव हैदरीची बहिण आहे आणि तिचादेखील राजघराण्याशी संबंध आहे. आमिर खान आणि किरण राव यांना एक मुलगा असून ज्याचे नाव आजाद राव खान आहे.

टॅग्स :आमिर खानकिरण राव