ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि रोमान्सचा बादशाह शाहरुख खान यांनी एका चित्रपटाच एकत्र काम केलं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण हे खरं आहे. शाहरुख, आमीर आणि सलमान खान यांना एकत्र पाहणं कोणाला आवडणार नाही. सिनेजगतात अनेक वेळा तसा प्रयत्नही करण्यात आला पण याला यश आले नाही.
आमीर आणि शाहरुख खान यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात एका चित्रपटात काम केलं आहे. आशुतोष गोवारीकरचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 1993 मधील पहला नशा चित्रपटात शाहरुख आणि आमीरने एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होता. तर शाहरुख खान आणि आमीर खान यांनी कॅमिओ (पाहुण्या कलाकाराची भूमिका ) केला होता.
1993 मध्ये आलेला पहला नशा या चित्रपटाला तिकिटखिडकीवर फारस यश मिळता आलं नसले तरी शाहरुख खान आणि आमीर खान यांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट स्मरणात राहिल. या दोन खानांशिवाय, सैफ अली खान, रविनां टंडन, पुजा भट्ट , जुही जावला, परेश रावल आणि मकरंद देशपांडे यांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे.
तर तिन्ही खान बनले असते ओम जय जगदीशशाहरुख, सलमान आणि आमीरला एकत्र घेऊन अनुपम खेर चित्रपट बणवणार होते. सलमान, आमीर, शाहरुख सोबत राणी मुखर्जी, काजोल आणि प्रिती झिंटा असा मल्टिस्टारर सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता. 2002 मध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ओम जय जगदिश हा चित्रपट आमीर, शाहरुख आणि सलमानला ऑफर केला होता. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे. तिघांनी ऑफर स्वीकारली असती, तर अनिल कपूरने साकारलेल्या मोठ्या भावाच्या म्हणजे ओमच्या भूमिकेत आमीर, फरदीन खानची भूमिका असलेल्या मधल्या भावाच्या भूमिकेत शाहरुख तर अभिषेक बच्चनने साकारलेल्या जगदीश या धाकट्या भावाच्या भूमिकेत सलमान दिसला असता.आमीरसोबत काजोल (आयेशा), शाहरुखसोबत राणी मुखर्जी (नीतू), तर सलमानसोबत प्रिती झिंटा (पूजा) झळकल्या असत्या. दुर्दैवाने या सहाही कलाकारांनी तारखा उपलब्ध नसल्याने ही भूमिका नाकारली. त्यामुळे महिमा चौधरी, उर्मिला मातोंडकर, तारा शर्मा यांच्या पारड्यात अनुक्रमे या भूमिका पडल्या.