Join us

फातिमावरुन आमिरच्या संसारात वादळ ?

By admin | Published: May 11, 2017 1:23 PM

बॉलिवूडमध्ये मेड फॉर इच अदर वाटावी अशी फार कमी कपल्स आहेत. अशा कपल्समध्ये आमिर खान आणि किरण रावच्या जोडीचा समावेश होतो. पण सध्या...

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - बॉलिवूडमध्ये मेड फॉर इच अदर वाटावी अशी फार कमी कपल्स आहेत. अशा कपल्समध्ये आमिर खान आणि किरण रावच्या जोडीचा समावेश होतो. पण सध्या आमिर आणि किरणच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या वैवाहिक नात्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये भांडणाला कारण ठरली आहे ती अभिनेत्री फातिमा सना शेख. 
 
आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखचे नाव फायनल झालेय. आमिरने त्याच्या आगामी सिनेमामध्ये फातिमाला संधी देण्याचा जो निर्णय घेतलाय तो किरण रावला आवडला नसल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. खरतर यापूर्वी आमिर आणि फातिमाने एकत्र काम केले आहे. दंगलमध्ये आमिरने फातिमाच्या वडिल आणि प्रशिक्षकाची भूमिका केली होती. आमिर आणि फातिमाची वाढती जवळीक किरणला खटकत असल्याने तिचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये फातिमाला घ्यायला विरोध होता अशी चर्चा आहे. 
 
दंगलमध्ये आमिरची मुलगी बनलेली फातिमा पुढच्या सिनेमात आमिरची प्रेयसी बनणार आहे. आमिर बरोबर रोमान्स करण्याची संधी मिळाली तर आपल्याला आवडेल असे फातिमाने एका मुलाखतीत सांगितले होते. दरम्यान आमिर आणि फातिमामध्ये फक्त मैत्रीच आहे की, त्यापुढे हे नाते गेलेय ते लवकरच समजेल. 
 
दरम्यान आमिर खानचे किरण राव बरोबर हे दुसरे लग्न आहे. आमिरचे पहिले लग्न रीना दत्तबरोबर झाले होते. कयामत से कयामत तक चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2002 मध्ये आमिरने रीना दत्तबरोबर घटस्फोट घेतला आणि किरण रावशी लग्न केले. 2002 मध्ये आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या लगान सिनेमाच्यावेळी आमिर आणि किरण रावच्या प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली होती.