VIDEO : बायकोला KISS न करता सुयश टिळक घराबाहेर निघाला होता आणि मग....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:11 PM2022-04-18T17:11:52+5:302022-04-18T17:13:18+5:30

Suyash Tilak , Aayushi Bhave : अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे दोघंही एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या त्यांच्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.

Aayushi Bhave Angry on Husband Suyash Tilak, Watch funny video | VIDEO : बायकोला KISS न करता सुयश टिळक घराबाहेर निघाला होता आणि मग....!!

VIDEO : बायकोला KISS न करता सुयश टिळक घराबाहेर निघाला होता आणि मग....!!

googlenewsNext

अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Aayushi Bhave) हे मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल. लग्नानंतर हे कपल नेहमीच चर्चेत असतं. सोशल मीडिया दोघंही अ‍ॅक्टिव्ह. दोघंही एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या त्यांच्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. पण यावेळी प्रकरण जरा वेगळं आहे. होय, आयुषी सुयशवर रागावली आहे. कशासाठी? तर किस न मिळाल्यानं.

आयुषीने तिच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सुयश घराबाहेर पडताना दिसतोय. पण घराबाहेर पडण्याआधी तो बायकोला किस करणं विसरतो. मग काय, आयुषी असा काय फुल्ल टू ड्रामा करते की क्षणभर सुयशही पाहून स्तब्ध होतो. जेव्हा नवरा घराबाहेर पडताना किस द्यायला विसरतो, असं आयुषीने या व्हिडीओवर लिहिलं आहे.

सुयशने हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत, ‘द ड्रामा मामा’ असं कॅप्शन दिलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. सायली संजीवने ‘मॅड’ अशी कमेंट केली आहे. ऋतुजा बागवेने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
सुयश व आयुषीने ऑक्टोबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या दोघंही आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.

सुयश   व आयुषीची भेट एका कार्यक्रमात झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं. पण सुयशने त्याच्या या प्रेमप्रकरणाबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. मात्र योग्य वेळ येताच गोड खुलासा करत त्याने चाहत्यांनाही सरप्राईज दिलं होतं. थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

आयुषी आणि सुयश दोघांनाही दाक्षिणात्य संस्कृती फार आवडते. त्यामुळे त्यांनी याच थीमनुसार साखरपुडा केला होता. यानंतर 21 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. सुशय टिळक हे नाव ‘का रे दुरावा’या मालिकेनंतर घराघरात पोहोचले. या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेत त्याने साकारलेली यश ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. 

Web Title: Aayushi Bhave Angry on Husband Suyash Tilak, Watch funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.