Join us

मेरे साई मालिकेतील अबीर सुफीने अशाप्रकारे केली सिद्धान्त कर्णिकची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 10:11 AM

मेरे साई या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना अचानक या सिद्धान्त कर्णिकला सेटवर चक्क डोक्याला मालिश करून मिळाले.

दिवसभराच्या धावपळीनंतर सगळ्यात छान जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे डोक्याला मालिश! टेलिव्हिजन कलाकार दररोज 12-13 तास काम करतात. त्यामुळे ते प्रचंड थकलेले असतात. या चित्रीकरणात अनेक गोष्टी सामील असतात – एका विशिष्ट व्यक्तिरेखेसाठी तयार होणे, विविध भावना अभिव्यक्त करणे, कडक उन्हात चित्रीकरण करणे, इत्यादी... पण तरीही सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई या मालिकेत अलीकडेच दाखल झालेल्या सिद्धान्त कर्णिकला गणपतराव ही भूमिका साकारायला खूप मजा येत आहे. मेरे साई या मालिकेच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना अचानक या गुणी कलाकाराला सेटवर चक्क डोक्याला मालिश करून मिळाले.

मेरे साई या मालिकेच्या एका दृश्यात साई बाबा (अबीर सूफी) लहान मुलांना नवीन बनवलेल्या मडक्यांवर हलके ठोकून ते पूर्ण भाजले गेले आहे की अजून कच्चे आहे हे कसे पारखायचे ते शिकवत असतात. यावर ही मुले निरागसपणे म्हणतात की, माणसांची पारख देखील अशीच करता आली असती तर किती छान झाले असते! त्यावर गणपतराव (सिद्धान्त कर्णिक) शिर्डी येथे आपल्या नाटकाचा शो करण्यासाठी आलेला आहे, ज्याला साई बाबा ‘कच्चे मडके’ म्हणतात. हेच चित्रीकरण सुरू असताना या चित्रीकरणादरम्यान अबीरने सिद्धान्तच्या डोक्याला हलकासा मसाज दिला, तेव्हा तो म्हणाला की, असे हळूवार मसाज दिल्याने बरे वाटते. चित्रीकरणातून मोकळे झाल्यानंतर देखील अबीरने त्याला काही वेळ हेड मसाज दिला. याबाबत अबीरला विचारले असता त्याने सांगितले, “सिद्धान्त खूप कमी कालावधीत आमच्या सगळ्यांचा चांगला मित्र बनला आहे. या दृश्याचे चित्रीकरण करत असताना, मी काही वेळा सिद्धान्तच्या डोक्यावर थोपटले तेव्हा त्याने असा हेड मसाज छान वाटत असल्याचे बोलून दाखवले. जेव्हा आम्हाला एक छोटी विश्रांती मिळाली तेव्हा मी त्याला खरोखरचा हेड मसाज दिला. तो एक छान आणि गंमतीशीर क्षण होता. कारण मी आत्तापर्यंत कधीच कुणाला मसाज दिलेला नाही, त्यामुळे त्याला त्याने बरे वाटेल की नाही याबद्दल मी साशंक होतो. पण त्याला माझा हा मसाज खूपच आवडला.”

टॅग्स :मेरे साई मालिकाअबीर सुफी