माझ्या नवऱ्याची बायकोमधील गॅरीने शेअर केला पत्नीसोबतचा सुंदर फोटो, दिसले रोमाँटिक अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:11 PM2021-03-16T19:11:28+5:302021-03-16T19:14:53+5:30
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत.
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. अभिजीत आणि सुखदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोना चाहत्यांनी पसंतीदेखील मिळते. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री सुखदासोबतचा रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघांमधील केमिस्ट्री दिसतेय. चाहत्यांनी फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता. ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.
1 फेब्रुवारी 2013 रोजी अभिजीत आणि सुखदा यांचं लग्न मोठ्या थाटात पार पडले होते. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.