Join us

बिग बॉस मराठीमध्ये असलेल्या अभिजीत सावंतच्या बहिणीला पाहिलंत? रक्षाबंधननिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 14:57 IST

सध्या बिग बॉस मराठीमध्ये असलेल्या अभिजीत सावंतच्या सोशल मीडियावर रक्षाबंधननिमित्त त्याच्या बहिणीचा फोटो शेअर करण्यात आलाय

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक सोशल मीडिया स्टार, अभिनेते सहभागी आहेत. याशिवाय सर्वांचा आवडता गायक अभिजीत सावंतही सहभागी आहे. अभिजीत त्याच्या शांतीत क्रांती खेळाने सध्या बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर चांगलाच चर्चेत आहे. आज रक्षाबंधननिमित्ताने अभिजीतच्या सोशल मीडियावर त्याचा बहिणीसोबतचा फोटो शेअर केलाय. 

ही आहे अभिजीतची बहीण, करते हे काम

अभिजीत सावंतच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या बहिणीचा रक्षाबंधननिमित्त फोटो शेअर केलाय. अभिजीतच्या बहिणीचं नाव आहे सोनाली सावंत. सोनाली ही पेशाने डान्सर असून तिला म्यूझिक आणि भटकंतीची आवड आहे. सोनाली यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी अभिजीतदादाला नक्कीच मिस करत असणार यात शंका नाही. अभिजीतला सुद्धा बिग बॉसच्या घरात रक्षाबंधनाला बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

अभिजीत गेल्या आठवड्यात सेफ झाला

गेल्या आठवड्यात अभिजीत, सूरज, योगिता आणि निखिल हे चौघे नॉमिनेट होते. यापैकी काल रविवारी घरात डबल एविक्शन झालं. या चौघांपैकी योगिता आणि निखिल हे दोघे घराबाहेर गेले. त्यामुळे अभिजीत तिसऱ्या आठवड्यात सेफ झाला. अभिजीत घरात शांत राहून, भांडणात कमी भाग घेऊन त्याचा खेळ दाखवत आहे. अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या खेळात अजून कशी मजल मारतो, याशिवाय तो फायनलपर्यंत पोहोचतो का? याची सर्वांना उत्सुकता आहे

टॅग्स :बिग बॉस मराठीरक्षाबंधनअभिजीत सावंत