पाच वर्षात पाच प्रोजेक्टस्, २१ नॅामीनेशनस्, ११ ॲवॅार्डस् अशी घवघवीत कामगिरी करणाऱ्या विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपी ही निर्मिती संस्था आता एक नवी कोरी वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता लवकरच घेऊन येणार आहे.
"सोपं नसतं काही" असे या वेब सीरिजचे नाव असून विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीचे संतोष रत्नाकर गुजराथी हे या वेब सीरिजचे निर्माते आहेत.वेब सीरिजचे लेखन , दिग्दर्शन, संगीतकार अशी तिहेरी भूमिका मयुरेश जोशी सांभाळणार आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर, शशांक केतकर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून अभिनेते आनंद इंगळे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहेत.
विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीने याआधी रंगभूमीवर ॲब्सोल्युट, घरात मॅरीड बाहेर बॅचलर, नॅाक नॅाक सेलीब्रीटी अशी वैविध्यपूर्ण नाटके तर छोट्या पडद्यावर रुद्रम, कट्टीबट्टी अशा मालिकांची निर्मिती केली आहे. किस्से बहाद्दर या वेब सीरिजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. आगामी सोपं नसतं काही या वेब सीरिज मधून नक्की काय "सोपं नसतं काही" हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.
अभिजीत खांडकेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच त्याची मालिका माझ्या नवऱ्याची बायकोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता तो क्रिमिनल्स... चाहूल गुन्हेगारांची या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन तो करणार आहे.
तर शशांक केतकरबद्दल सांगायचं तर तो सध्या पाहिले न मी तुला या मालिकेत काम करतो आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे 'मनाचे श्लोक' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे. या चित्रपटाचे काही महिन्यांपूर्वी शूटिंग पूर्ण झाले आहे.