अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) नुकताच पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि लेक आराध्यासोबत (Aaradhya) एका लग्नसोहळ्याला उपस्थित होता. त्यांचे लग्नातील अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. बऱ्यचा दिवसांनी अभिषेकला पत्नी आणि मुलीसोबत चाहतेही सुखावले. तसंच सोशल मीडियावरील उलट सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. आता नुकतंच तिघांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते अभिषेक-ऐश्वर्याच्या आयकॉनिक 'कजरा रे' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
अभिषेक बच्चनच्या एक चुलत भावाचं नुकतंच लग्न पार पडलं. यासाठी तो सहकुटुंब लग्नाला गेला होता. इतकंच नाही तर त्याने तिथे डान्सही केला. अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि इतर काही लोक स्टेजवर असताना 'बंटी और बबली' मधलं आयकॉनिक 'कजरा रे' गाणं लागतं. यावर तिघेही थिरकतात. हे गाणं ओरिजनली अमिताभ बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्यावर चित्रीत झालं आहे. याच गाण्यावर बिग बींची नात आराध्याही नाचताना दिसली. अभिषेक, ऐश्वर्यासोबत तिने ठुमके लावले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचं पाहून चाहते खूश झालेत. तसंच लग्नात पारंपरिक पेहरावात तिघेही छान दिसत आहेत.
अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचं तर नुकताच त्याचा 'बी हॅपी' सिनेमा रिलीज झाला. तर त्याआधी 'आय वॉन्ट टू टॉक' आला होता. दुसरीकडे ऐश्वर्या शेवटची 'पोन्नियन सेल्वन २' मध्ये दिसली. बऱ्याच काळापासून ती हिंदी सिनेमात मात्र दिसलेली नाही.