अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) स्क्रीनवर कायम संयमित भूमिकेत दिसला आहे. ना कुठला किसींग किंवा बेड सीन ना कोणता वादग्रस्त सीन. त्याने कधीच फारसे इंटिमेट सीन्सही दिलेले नाहीत. नुकताच त्याचा 'बी हॅपी' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये तो एका ८ वर्षांच्या मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. प्रमोशनवेळी अभिषेकने सिनेमांमध्ये इंटिमेट किंवा सेक्स सीन का करत नाही याचा खुलासा केला.
'द क्विंट'शी बातचीत करताना अभिषेकला विचारण्यात आलं की, 'असं काय आहे जे तुला सिनेमात करायला आवडणार नाही?' यावर अभिषेक म्हणाला, "पहिली गोष्ट जर मला माझ्या भूमिकेत त्या कॅरेक्टरच्या भावनाच आणता येत नसतील तर मी तो सिनेमा करणार नाही. तसंच सेक्स सीनही करणार नाही. मला त्यात कंफर्टेबल वाटत नाही. स्क्रीनवर हे सगळं दाखवायला मला आवडत नाही. मी त्या लोकांमधला आहे जो आजही एकट्यात काही पाहत असेन आणि जर कोणता सेक्शुअल सीन आला तर मला विचित्र वाटतं."
तो पुढे म्हणाला, "एका लेकीचा बाप बनल्यापासून मी नेहमीच असे चित्रपट केले जे मी लेकीसोबत बसून बघू शकेन. हे सगळं मी आदर्श घ्यावा म्हणून सांगत नाहीए. पण मला माहित नाही माझी मुलगी हे सगळं बघून काय विचार कले. 'बाबा हे काय करतोय?' असं तिच्या मनात आलं तर...हा विचार करुनच मी सिनेमे निवडतो. तसंच मनाला पटणाऱ्या सिनेमालाच होकार देतो."
अभिषेक बच्चनचा 'बी हॅपी' नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये बालकलाकार इनायत वर्मा त्याच्या मुलीच्या भूमिकेत आहे. यामध्ये अभिषेकची सिंगल फादरची भूमिका आहे. हा एक डान्स ड्रामा आहे. याआधी अभिषेक शूजित सरकारच्या 'आय वॉन्ट टू टॉक' मध्ये दिसला होता.