Join us

आबोली फेम अकुंशच्या पत्नीचेदेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी खास कनेक्शन, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 17:10 IST

आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.

 सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला 'अबोली' (Aboli) या मालिकेतील  इनस्पेक्टर अंकुश शिंदे उर्फ सचित पाटीलविषयी सांगणार आहोत.

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडीबाबत सांगणार आहोत. ही जोडी आहे प्रसिद्ध  सचित पाटील आणि तिच्या पत्नीची. 

 सचित पाटीलची पत्नी ही प्रसिद्ध गायिका असून तिने अनेक हिट गाणी गायली आहेत.त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा पै असून तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. तिने मराठीसोबतच भोजपूरी भाषेत देखील गाणी गायली आहेत. सचितच्या क्षणभर विश्रांती या चित्रपटातील अनेक गाणी तिने गायलेली असून या गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली आहे. क्षणभर विश्रांती या चित्रपटात त्याने काम करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने अर्जुन, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.  

टॅग्स :सचित पाटीलटिव्ही कलाकार