Join us

Lady Gaga : हॉलिवुड गायिका लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला; आरोपीला तब्बल २१ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 17:25 IST

हॉलिवुडची प्रसिद्ध गायिका, फॅशन आयकॉन लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला करणाऱ्याला तब्बल २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Lady Gaga : हॉलिवुडची प्रसिद्ध गायिका, फॅशन आयकॉन लेडी गागाच्या कुत्र्यावर हल्ला करणाऱ्याला चक्क २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील वर्षीच्या या प्रकरणावर आज कोर्टाने निर्णय दिला.

२०२१ मध्ये लेडी गागाच्या (French Bulldog) 'फ्रेंच बुलडॉग' या कुत्र्याला चोरण्याच्या उद्देशाने जैकसन आणि त्याच्या दोन साथीदारांनी हल्ला केला.  दरम्यान कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन आलेला रायन फिशर यामध्ये जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र यानंतर जॅकसन वर हल्ला केल्याप्रकरणी केस करण्यात आली. जॅकसनचे इतर दोन साथीदार आधीच तुरुंगात आहेत. 

या हल्ल्यानंतर जॅकसन आणि त्याचे साथीदार कोजी आणि गुस्तव या दोन कुत्र्यांना घेऊन निसटले, तर एशिया हा तिसरा कुत्रा सुखरुप सुटला. एशियाला शोधुन देणाऱ्यासाठी लेडी गागाने ५ लाख डॉलरच्या बक्षिसाचीही घोषणा केली.

पोलिस काय म्हणाले ?

लॉस एंजिलिस पोलिसांच्या सांगण्यानुसार फ्रेंच बुलडॉग्सची बाजारातील किंमत खुप जास्त आहे. म्हणुनच त्यांना चोरुन पैसे मिळतील या प्रयत्नाने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. लिओनार्डो डी कॅप्रिओ, मैडोना, रीस विदरस्पुन यांच्याकडेही फ्रेंच बुलडॉग आहेत. सेलिब्रिटींच्या मागणीनंतर या कुत्र्यांची किंमत वाढली आहे. 

टॅग्स :लेडी गागाकुत्रातुरुंग