Join us

होणाऱ्या नवऱ्याकडून प्रपोज, 'कहो ना प्यार है'वर डान्स! कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:01 IST

आई कुठे काय करते फेम कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल झालेत

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच लग्न करणार आहे. कौमुदी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. कौमुदी वलोकरचा संगीत सोहळा काल पार पडला. या संगीत सोहळ्याला कौमुदीचा होणारा नवराही उपस्थित होता. कौमुदीच्या संगीत सोहळ्याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यामध्ये कौमुदी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मजा-मस्ती करताना दिसतेय. 

कौमुदीला आकाशने केलं प्रपोज; दोघांचा डान्स व्हायरल

अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे खास व्हिडीओ समोर आलेत. या व्हिडीओत पाहायला मिळेल की, कौमुदीला तिचा होणारा नवरा आकाशने गुडघ्यावर बसून प्रपोज केलंय. खास काव्यात्मक अंदाजात कौमुदीचा हात हातात घेऊन आकाशने तिला लग्नाची मागणी घातलेली दिसली. तर दुसरीकडे एका व्हिडीओत कौमुदी-आकाशने 'कहो ना प्यार है' गाण्यावर जबरदस्त डान्स केला. दोघांच्या डान्सला उपस्थित लोकांनी टाळ्या अन् शिट्ट्या वाजवून चांगलीच दाद दिली.

 

कौमुदी-आकाशचा लग्नसोहळा

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार कौमुदी-आकाशने लग्न केलं असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पारंपरिक थाटात कौमुदी-आकाशचा लग्नसोहळा पार पडलाय. कौमुदीच्या लग्नाला तिचे जवळचे मित्र-मैत्रीण आणि कुटुंबीय उपस्थित असल्याचं समजतंय. लग्नाचे फोटो समोर येताच अनेकांनी कौमुदी-आकाश या न्यू वेड्स कपलचं कमेंट्सच्या माध्यमातून  अनेकांनी अभिनंदन केलंय. 'आई कुठे काय करते' मालिकेतून कौमुदी सर्वांच्या पसंतीस उतरली.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकालग्नटेलिव्हिजन