‘स्टार भारत’वरील ‘राधाकृष्ण’ मालिकेत राधा आणि कृष्ण यांच्यातील निरंतर आणि नि:स्वार्थी प्रेमाची गाथा सादर केली जात आहे. मालिकेत अलीकडेच सोहम या नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश झाला असून अखिल कटारिया हा अभिनेता ती भूमिका साकारीत आहे. सोहमच्या प्रवेशानंतर मालिकेच्या कथानकात काही नाट्यपूर्ण घटना घडणार आहेत.
मालिकेत चंद्रावलीचा प्रियकर म्हणून सोहमचा प्रवेश होतो. सोहमने चंद्रावलीसाठी लिहिलेल्या सुंदर कवितांमुळे ती त्याच्या प्रेमात पडते. परंतु राधाच्या मनात सोहमबद्दल फार चांगल्या भावना उमटत नसल्या, तरी ती आपल्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याऐवजी कृष्णावर विसंबून राहण्याचे धोरण स्वीकारते. म्हणूनच ती सोहमचा चंद्रावलीशी होत असलेल्या भेटीगाठीकडे दुर्लक्ष करते आणि चंद्रावलीला सावध करीत नाही. राधाचा आतला आवाज चुकीचा असतो का? की ही तिची सर्वात मोठी चूक ठरणार असून त्याबद्दल तिला पुढे सतत पश्चात्ताप करीत रहावा लागणार असतो?