Join us

रवी किशन यांनाही आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाले, "रात्री कॉफीसाठी बोलवलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 17:23 IST

सिनेसृष्टीत काम करताना रवी किशन यांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. 

रवी किशन हे भोजपुरी कलाविश्वातील मोठं नाव आहे. भोजुपरीबरोबरच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. 'बाटला हाऊस', 'तेरे नाम', 'खाकी', 'गंगा' यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. पण, मनोरंजनविश्वातील त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. सिनेसृष्टीत काम करताना रवी किशन यांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. 

टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत रवी किशन यांनी कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, "मला कधी या गोष्टीचं आश्चर्य नाही वाटलं. या वाटेवर जायचं नाही, हे मी आधीच ठरवलं होतं. कारण, आयुष्यात शॉर्ट कट नसतो, ही गोष्ट मला वडिलांनी शिकवली होती. जर शॉर्ट कट असेल तर ती गोष्टही थोड्याच काळापुरती असते." 

"सुरुवातीपासूनच मेहनत करुन स्वत:ला तयार करायचं, असं मी ठरवलं होतं. मला ३३-३४ वर्ष झाली आहेत, तरीही मी आजही सिनेमात काम करत आहे," असंही ते पुढे म्हणाले. कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ते म्हणाले, "जीवनात असे लोक येत असतात. कोणी कॉफीसाठी बोलवतं तर कोणी चहासाठी. रात्री लोक कॉफी का पित असतील, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे."

टॅग्स :रवी किशनसेलिब्रिटीकास्टिंग काऊच