Join us

शिवरायांचा चिमुकला मावळा; अंकित मोहनच्या लेकाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:16 IST

Ankit mohan: अंकितने अलिकडेच इन्स्टाग्रामवर रुआनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला रुआन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करताना दिसत आहे. 

'फत्तेशिकस्त','फर्जंद' आणि 'पावनखिंड' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे अंकित मोहन (ankit mohan). मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अंकित बऱ्याचदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वीच अंकितच्या पत्नीने अभिनेत्री रुची सवर्ण हिने चिमुकल्या बाळाला जन्म दिला. या दोघांचं बाळ आता  ७ महिन्यांचं झालं असून त्यांनी सोशल मीडियावर या बाळाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र, यावेळी अंकितने रुआनचा शेअर केलेला व्हिडीओ कमालीची चर्चेत आला आहे.

अंकितने अलिकडेच इन्स्टाग्रामवर रुआनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला रुआन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करताना दिसत आहे.  व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकित त्याच्या चिमुकल्या बाळाला महाराजांसमोर कसं नतमस्तक व्हावं, त्यांना कसा मुजरा करावा हे शिकवत आहे.

दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज आज तुमचा लहान मावळा ७ महिन्यांचा झाला आहे. त्याच्यावर तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. रुआनला ७ व्या महिन्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. बाळाला प्रेम आणि आशीर्वाद पाठवत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार,” असं कॅप्शन अंकितने या व्हिडीओला दिलं आहे.

टॅग्स :अंकित मोहनसेलिब्रिटीसिनेमा