Join us  

अयोध्या विमानतळावर पोहोचले साक्षात 'श्रीराम', अरुण गोविल यांच्या स्वागतासाठी जमली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 9:18 AM

चाहत्यांनी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचंही पाहायला मिळत आहे.

Ayodhya Ram Mandir: सध्या देशभरात 'जय श्रीराम' चे नारे ऐकू येत आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज, साधुसंत महंत या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil)  नुकतेच अयोध्येत पोहोचले. विमानतळावर लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि पाया पडून आशिर्वादही घेतले. अरुण गोविल यांनी स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. 

'रामायण' मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली. तर अभिनेत्री दीपिका चिखलिया सीतामातेच्या भूमिकेत दिसल्या. या दोघांनाही लोकांनी खरोखरंच प्रभू श्रीराम आणि सीतामातेचं स्थान दिलं. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रण मिळालं आहे. अरुण गोविल यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले, ' आज पहिल्यांदा विमानाने अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी विमानतळावर उतरल्यानंतरची ही दृश्य...खूपच सुंदर विमानतळ आहे. जय श्रीराम.'  

अभिनेते अरुण गोविल ज्याप्रकारे सर्वांना आदरपुर्वक भेटत होते, फोटो देत होते हे पाहून नेटकरी खूपच प्रभावित झाले आहेत. तसंच कमेंटमध्ये सर्वांनी 'जय श्रीराम'चे नारे लावले आहेत. विमानतळावर अरुण गोविल यांचं स्वागत करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. 

22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मनोरंजनक्षेत्रातून अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, कंगना रणौत यांच्यासह अनेक कलाकार पोहोचणार आहेत. 

टॅग्स :अयोध्याटिव्ही कलाकाररामायणराम मंदिरसोशल मीडिया