Join us

अभिनेता चिराग पाटीलने सोशल मीडियावर फोटो केले शेअर, म्हणाला 'ईट हेल्दी स्टे हेल्दी', जाणून घ्या त्याचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 06:00 IST

आपल्या फॅन्सशी चिराग पाटील कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती चिराग फॅन्ससह शेअर करत असतो.चिराग फिटनेसबाबतही तितकाच सजग आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. त्यांच्यासह आगामी सिनेमा, ट्रेलर, भूमिका याविषयी गप्पा मारतात. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रिटी सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता चिराग पाटील. आपल्या फॅन्सशी चिराग कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती चिराग फॅन्ससह शेअर करत असतो. शिवाय आपल्या फॅन्ससह काही चांगले विचारही शेअर करत असतो. चिराग फिटनेसबाबतही तितकाच सजग आहे. 

आपल्या फॅन्ससह तो फिटनेस मंत्रा शेअर करतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तो वर्कआऊटबरोबरच योग्य आहार घेणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून देत असल्याचे पाहायला मिळतंय. योग्य वर्कआऊट आणि योग्य डाएट घेणे नेहमीच फायदेशीर ठरते त्यामुळे त्याचे हे नवीन फोटो पाहून चाहत्यांना देखील प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की. तसेच आपल्या मोकळ्या वेळेचा तो उपयोग जीवनात शांतता, समाधान मिळवण्यासाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

कामा व्यतिरिक्त चिराग कुटुंबासोबतही क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळते. चिराग कायमच आपले कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळतं. चिराग लेक रायनासह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे.

चिराग हा भारताच्या प्रसिद्ध माजी क्रिकेटरचा मुलगा. मात्र वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता त्याने अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडलं. तो अभिनेता म्हणजे भारताचे  माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा लेक आहे. आपल्या अभिनयाने चिरागने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 'वजनदार', 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध सिनेमात त्याने काम केलं आहे.

याशिवाय 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी सिनेमातही त्याच्या अभिनयाची जादू दिसली आहे. लवकरच चिराग कबीर खान दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर '८३' या हिंदी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात चिराग आपल्या वडिलांची म्हणजेच संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :चिराग पाटील८३ सिनेमा