Join us  

Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:19 AM

Deepak Tijori : बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीची मोठी फसवणूक झाली आहे. अभिनेत्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्यावर पैशांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीची मोठी फसवणूक झाली आहे. अभिनेत्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्यावर पैशांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दीपकने आरोप आहे की, निर्मात्याने चित्रपट बनवण्यासाठी त्याच्याकडून मोठी रक्कम घेतली आणि नंतर पैसे देण्यास नकार दिला. दीपकने विक्रम खाखर यांच्याविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रिपोर्टनुसार, मुंबई पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता दीपक तिजोरीने निर्माता विक्रम खखरवर चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात तब्बल १७.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दीपक तिजोरीने आंबोली पोलीस ठाण्यात पैशाच्या फसवणुकीप्रकरणी धाव घेतली आहे.

विक्रम खाखर यांनी लंडनमध्ये त्यांच्या 'टिप्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं ज्यासाठी त्याच्याकडून १७.४० लाख रुपये घेतले होते. जेव्हा मी चित्रपटाबाबत विचारलं तेव्हा निर्माता विक्रम खाखर कोरोनामुळे उशीर झाल्याचं कारण सांगायचे. चित्रपटाचं शूटिंग युरोपमध्ये थांबलं आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही ते कारणं पुढे करत राहिले असं दीपकने म्हटलं आहे. 

दीपकने सांगितले की, 'टिप्सी'चे शूटिंग सुरू करण्याचा निर्मात्याचा कोणताही विचार नसल्याचं लक्षात आल्यावर पैसे परत मागितले. मात्र पैसे परत न झाल्याने अभिनेत्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. ही घटना ३ मार्च २०२० ते यावर्षी १४ मार्च दरम्यान घडली. दीपकने ३ मार्च २०२० रोजी निर्मात्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते. दिलेल्या पैशात जीएसटीचाही समावेश आहे. निर्मात्याने आपले आश्वासन पूर्ण केले नाही आणि पैसे परत करण्यासही नकार दिला. 

टॅग्स :दीपक तिजोरीधोकेबाजीपैसापोलिसगुन्हेगारी