सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चर्चा आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक सोशल मीडिया स्टार, अभिनेते आणि मनोरंजन विश्वातील कलाकार सहभागी आहेत. बिग बॉस मराठीचा हा सीझन चांगलाच गाजतोय. यंदाच्या सीझनमध्ये खास चर्चा आहे ती म्हणजे धनंजय पोवारची. DP दादा असे धनंजयला घरातील सर्वच हाक मारत असतात. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंनी यांनी DP दादाचं खास शब्दात वर्णन केलंय
DP बद्दल काय म्हणाले केदार शिंदे?
कॅचअप या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले की, "DP च्या पंचालाईन्स खूप आवडतात. त्याच्या पंचलाईन्स विनोदी असतात. DP फॅमिलीवाला माणूस आहे. मला यांच्या गेम्स वगैरे कळत नाहीत. आता कसंय माहित आहे ना, सगळेच स्पर्धक गो विथ द फ्लो असे चाललेत. प्रत्येकाचं डोकं त्या पद्धतीने लागून ते खेळतायत. पण माणसं म्हणून मला फार गंमत वाटते. आता DP सारखा माणूस जेव्हा डान्स-बिन्स करतो तेव्हा तो मला एकदम सत्यासारखा भिकू म्हात्रेच वाटतो. तो चेहरा वेगळा करुन काहीतरी करतो ना तेव्हा तो भिकू म्हात्रेच दिसतो. तर बरेच वेळा वाटतं की, मनोज वाजपेयी थोडा जाडा असता तर सेम दिसला असता."
DP चा खेळ भारी, मैत्री न्यारी
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी सर्वच स्पर्धक आता जोर लावून खेळत आहेत. यामध्ये जास्त चर्चा आहे ती म्हणजे धनंजय पोवार अर्थात DP ची. पहिले काही आठवडे घरात शांत असणारा DP चा खेळ आता मात्र चांगलाच फायर मोडवर गेलाय. DP या आठवड्यात कॅप्टनसी टास्कचा मुख्य दावेदार होता. याशिवाय कॅप्टनसी उमेदवारी मिळवण्यासाठी DP ने चांगला खेळ खेळला. DP ची घरातील सर्वांसोबत चांगली मैत्री आहे. DP फायनलपर्यंत मजल मारेल का, याची सर्वांना उत्सुकता आहे.