Join us

ड्रग्सच्या आहारी गेला होता हा अभिनेता, आज आहे इंडस्ट्रीतून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 1:37 PM

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नाव आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही ड्रग्सच्या बाबातीत नवा समोर आी आहेत. बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या सीक्रेट ड्रग्ज पार्ट्या चर्चेत आल्या आहेत.

स्टारडम सांभाळणं आणि ती बराच काळ समर्थपणे टिकवून ठेवणं हे प्रत्येकालाच जमत नाही. जितक्या वेगाने अभिनेता फरदिन खान लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन तो खालीही फेकला गेला. स्वतःला मिळालेलं स्टारडम तो सांभाळू शकला नाही आणि वाट चुकला. ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान आज ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर आहे. फरदीनची आज गेल्या काही वर्षापासून अजिबात चर्चा नाही.  परंतु अलीकडेच तो त्याचे वाढलेले वजनामुळे त्याचा लूक समोर आला होता. तेव्हा त्याला काहींनी ओळखलेही नव्हते. त्याच्यात झालेल्या बदलामुळे तो चर्चेत आला होता. 

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीचे  नाव आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही ड्रग्सच्या बाबातीत नवा समोर आी आहेत. बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या सीक्रेट ड्रग्ज पार्ट्या चर्चेत आल्या आहेत.काही वर्षापूर्वीफरदीन खानलाही ड्रग्समुळे तुरूंगातील हवा खावी लागली होती. फरदीन खानचे नाव त्यावेळी माध्यमांच्या बातम्यांमध्ये सतत असायचे. त्याच्याशी संबंधित ड्रग्सचा वाद चर्चेत आला होता. २००१ मध्ये फरदीन खानला नाशिकमध्ये ड्रग्स पुरवठा सप्लाय करणा-यांकृडून कोकेन खरेदी करतांना रंगेहाथ पकडले होते.ड्रग्स प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी फरदीनसह इतरांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीनजवळ कोकेन सापडले होते, ज्यामुळे अभिनेत्यावर कलम 21 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता. NDPS कायद्यांतर्गत फरदीनवर आरोप दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या विशेष कोर्टाने फरदीन खानला कोकेन प्रकरणातून निर्दोष घोषित करत त्याची सुटका केली होती. कोणत्याही सामान्य कैद्याप्रमाणे त्याने शिक्षा भोगली आहे. मात्र त्यामुळे त्याला कसे हाल सोसावे लागले याचीही जाण फरदीनला आली होती.वेळीच त्याने स्वतःला सावरलं.

 

स्वतःला हरु न देता त्याचा त्यांने सामनाही केला. ड्रग्जच्या प्रकरणात अडकल्यानंतर फरदीनने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यायला सुरूवात केली होती. चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय झालेला फरदीन मात्र वडील फिरोज खानप्रमाणे बॉलिवूडमध्ये मिळालेले यश फार काळ टिकवू शकला नाही. 

 

टॅग्स :फरदीन खानरिया चक्रवर्ती