Join us

'प्लिज सुपरस्टार मला म्हणू नका, सुपरस्टार तो असतो जो…', नेमकं काय म्हणाला अभिनेता गश्मीर महाजनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:36 IST

गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत गश्मीर अभिनय क्षेत्रात आला. नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने कलाविश्वात मेहनतीच्या जोरावर जम बसवला. गश्मीरने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्याची स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. यातच आता गश्मीरच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

नुकतेच ट्विटवर आताचे X वर एका चाहत्यानं गश्मीरचे फोटो शेअर केले. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'मराठी सिनेअभिनेते सुपरस्टार गश्मीर महाजनी". पण गश्मीरला मात्र त्याला सुपरस्टार हा टॅग आवडला नाही. यावर गश्मिरनं लगेच रिट्विट करत चाहत्याला रिप्लाय दिला. त्याने लिहलं, 'Plz superstar बोलु नका… अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आत्ता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की .. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चाल्ला कि सर्वलोक कपडे फाडतात…  नक्की होणार … माझं वचन आहे. पण आत्ता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणु नका'. गश्मीरच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

गश्मीरने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात गश्मीर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दुहेरी भूमिकेत होता.  गश्मीरने 'देऊळ बंद', 'धर्मवीर', 'कॅरी ऑन मराठा', 'बोनस' या सिनेमांत काम केलं आहे. 'ईमली', 'तेरे इश्क मे घायल' या हिंदी मालिकांमध्येही गश्मीर झळकला. त्याने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.   

टॅग्स :गश्मिर महाजनीसेलिब्रिटीसिनेमामराठी अभिनेतामराठी चित्रपटसोशल मीडिया