सोनी मराठीवर भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा (Bhumikanya Saad Ghalte Nisargaraja) ही नवी मालिका प्रेक्षकांना १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे. आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ मालिकेची झलक प्रेक्षकांना विशेष आवडली आणि त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar) प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
अभिनेता गौरव घाटणेकर या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून गौरव या मालिकेत चक्क दुहेरी भूमिका साकारणार आहे. ती म्हणजे तो या मालिकेचा निर्मातासुद्धा आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती केली जात असून १० जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.