Join us

चार वर्षांपासून पडद्यावरून गायब आहे हा ‘खान’, काय संपले अ‍ॅक्टिंग करिअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 4:17 PM

अनेक दिवसांपासून तो त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.

आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खान याने ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण गेल्या चार वर्षांपासून इमरान एकाही सिनेमात दिसला नाही. इमरान चित्रपटसृष्टीतून गायब झाला, यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. काहींच्या मते, प्रकृतीच्या कारणाने तो बॉलिवूडपासून दूर आहे तर काहींच्या मते, पर्सनल आयुष्यातील अडचणींमुळे तो चित्रपटांपासून लांब राहतोय.

काही दिवसांपूर्वी इमरानचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात तो चांगलाच आजारी दिसत होता. यानंतर इमरानच्या प्रकृतीबद्दल अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती.आज हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, आज त्याचा वाढदिवस.13 जानेवारी 1983 रोजी जन्मलेल्या इमराने 2008 मध्ये बॉलिवूड डेब्यू केला होता. आमिरचा भाचा म्हणून त्याच्या या डेब्यूची चांगलीच चर्चा झाली होती. पण पुढे इमरानच्या नावावर अनेक फ्लॉप सिनेमे जमा झालेत आणि त्याच्या  फ्लॉप सिनेमांसाठीच तो ओळखला जाऊ लागला. 

‘जाने तू या जाने ना’ हा इमरानचा पहिला चित्रपट हिट झाला होता. त्यामुळे पाठोपाठ अनेक चित्रपटांत तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. २०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. 

 इमरान खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.  इमरान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. काही महिन्यांपासूनअवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. म्हणजेच इमरानच्या पर्सनल लाईफमध्येही प्रॉब्लेम्स आहेत. इमरानने २०११ साली अवंतिकासोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना इमायरा नावाची एक मुलगीही आहे. 

टॅग्स :इमरान खान